संडास साफ होण्यासाठी उपाय | Pot saf honyasathi Upay

पोट साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध, पोट साफ होण्यासाठी योगासने, पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय, संडास साफ होण्यासाठी उपाय, अपचन उपाय ,
{tocify} $title={Table of Contents} 

 पोट साफ होण्यासाठी आयुर्वेदिक औषध, पोट साफ होण्यासाठी योगासने, पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय, संडास साफ होण्यासाठी उपाय.

कोणत्याही आजाराची सुरवात हि आपल्या पोटा पासूनच सुरु होते. व्यवस्थित पचन नं होणे किंवा पोट साफ न होणे याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतो. आपण कशा प्रकारचे अन्न घेतो आणि वेळेवर घेतो का यावर सुद्धा अवलंबून आहे.

पोट साफ न होणे हि समस्या अनेक लोकांना असते. याची अनेक करणे असू शकतात. जसे रात्री जेवाल्यानंतर लगेच झोपणे, शरीराची हालचाल कमी असणे किंवा व्यायाम न करणे, पाणी कमी पिणे.

याला बद्धकोष्ठता असेही म्हणतात. यामुळे शौचास त्रास होतो, अपचन वाढते, शौचास घट्ट होते आणि शौचास जोर द्यावा लागतो. यामुळे मूळव्याध देखील होऊ शकते, पण याची संभावना खूप कमी आहे.

पोट साफ होण्यासाठी व संडास साफ योण्यासाठी उपाय

पोट साफ होण्यासाठी उपाय -

लिंबू व पाणी


सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी घ्यावे आणि त्यामध्ये अर्धे किंवा एक लिंबू पिळावे. आणि हे पाणी पिऊन घ्यावे. पुढील 20 मिनिटामध्ये प्रेशर येऊन पोट साफ होईल. तुम्ही हे पाणी दररोज सकाळी नियमित पणे पिऊ शकता.

पोट साफ होण्यासाठी एरंडेल चे तेल पिणे


पोट साफ होण्यासाठी एरंडेल तेल हे उत्तम गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार एरंडेल चे तेल मध्ये अनेक सारक गुण आहेत. जे पोटातील मळ बाहेर काढण्यास मदतगार असतात.
तुम्हाला प्रश्न पडला असेल कि पोट साफ होण्यासाठी एरंडेल तेल कसे घ्यावे ?
 तुम्ही सकाळी उपाशी पोटी नियमित पणे एक चमचा एरंडेल पिऊ शकता. याने तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल.

Note: एका वेळेस एकच चमचा एरंडेल तेल घ्यावे, जास्त घेऊ नये.


मनुके खाणे


थोडेसे मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेऊन सकाळी उपाशी पोटी खावेत. बिजलेल्या मानुक्याचे पाणी पिऊ शकता. यासाठी काळे मनुके घेतले तर अधिक फायदेशीर राहील, नाही तर तुम्ही कोणतेही मनुके घेऊ शकता.

भरपूर प्रमाणात पाणी पिणे


पोट साफ ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणत पाणी पिणे गरजेचे असते. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी शरीराला योग्य प्रमाणात पाणी आवशक असते. यामुळे शरीर नैसर्गिकरित्या साफ राहण्यास मदत होते. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवशक आहे.

जेवण करण्याच्या अगोदर किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे योग्य नाही. त्यामुळे पचन होण्यास वेळ लागतो.

त्रिफळा चूर्ण


त्रिफळा चूर्णा मध्ये बेहडा, हिरडा व आवळा हे आयुर्वेदिक घटक आसतात. याने आपली पचन क्रिया आणि पचन शक्ती सुधारते. त्रिफळा चूर्ण हे रात्री झोपण्यापूर्वी व्यावे. एक ग्लास कोमट पाणी आणि एक-दोन चमचे त्रिफळा चूर्ण मिसळून घ्यावे. पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्ण अत्यंत उपयोगी आहे.

पोट साफ होण्यासाठी योगासने

पोट साफ करण्यासाठी खालील सहा योगासने करावेत जेणेकरून पोट साफ होण्यास मदत होईल 
  1. मार्जारीसन
  2. पवनमुक्तासन
  3. अधोमुख श्वानासन
  4. अर्धमत्स्येंद्रासन
  5. भुजंगासन
  6. धनुरासन
  

पोट साफ न होण्याची लक्षणे

  • पोट जड वाटणे.
  • मलविसर्जनाच्या वेळी जोर लावावा लागणे.
  • मलविसर्जनास वेळ लागणे.
  • मलविसर्जन व्हावे तशी न होणे.
  • भूक मंद अथवा न लागणे.
  • शांत झोप न लागणे, डोके दुखणे.
  • कामात उत्साह न वाटणे.
  • स्वभाव चिडचिडा होणे.

पोट साफ होण्यासाठी आणि  अपचन उपाय

  • रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नये.
  • दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्यावे.
  • योग्यवेळी आणि नियमित जेवण करावे.
  • जेवताना गडबड करू नये, सावकाश जेवण करावे.
  • फास्ट फूड, जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
  • तुम्ही जर बसून काम करीत असाल तर, दररोज व्यायाम करणे आवशक आहे.
  • हलक्या अन्न पदार्थाचे सेवन करावे. पचायला जड असलेले पदार्थ खाणे टाळावे.

तर मित्रानो संडास साफ होण्यासाठी उपाय pot saf honyasathi upay याची योग्य माहिती मिळालेली आहे. याचा तुम्हाला फायदा देखील होईल! परंतु तुम्हाला याचा जास्त प्रमाणात त्रास होस असेल तर तुम्ही डॉक्टर चा सल्ला घेणे योग्य राहील.

About the author

Nandkishor
मी लेखक आहे. मला लेखन करायला आवडतं! मी 4 वर्षांपासून ब्लॉग लेखन करत आहे. माझे लेखन मनोरंजक, उपयुक्त आहे आणि लोकांना स्वारस्य ठेवते. माझे लेख विशेष आहेत आणि लोकांना ते वाचायला आवडतात.

टिप्पणी पोस्ट करा