नमस्कार वाचकांनो, या लेखामध्ये तुम्हाला सुंदर आणि मनमोहक सर्व फुलांची माहिती ( Flowers information in Marathi ) वाचायला मिळणार आहे.
तसे पाहायला गेले तर जगभरात असंख्य प्रकारची / अनेक जातीची फुले आहेत. माणसांना फुलांची खूप आवड आहे. आपण आपल्या घरासमोरच्या कुंडीत म्हणा किंवा गार्डन मध्ये फुलझाडांची लागवड करतो. आणि फुलांचा आनंद घेतो.
Flowers information in Marathi
1. Rose Flower information in marathi ( गुलाब फुलाची माहिती )
सर्व फुलामध्ये गुलाबाचे फुल हे सर्वाधिक लोकप्रिय आहे. गुलाबाच्या फुलांचा वापर हा दुगंधी अत्तर बनवण्यासाठी सुद्धा करतात. गुलाबाचे फुल हे जगभरात जवळ- जवळ सर्व ठिकाणी पाहायला मिळते.गुलाबाच्या फुलाचा वापर खास करून प्रेमी लोक आपल्या प्रेमाचा प्रोपोस करण्यासाठी करतात. गुलाबाच्या फुलाला प्रेमाचे प्रतिक देखील मानतात.
गुलाबाचे फुल खूप सुगंधित असते. संपूर्ण भारतात गुलाबाचे फुल पाहायला मिळते. उत्तर आणि दक्षिण भारतात गुलाबाच्या फुलांची शेती केली जाते. या ठिकाणी फुलासाठी अनुकूल वातावारण पाहायला मिळते. भारतात लाल रंगाचे गुलाब आढळतात.
गुलाबाचे वैज्ञानिक नाव हाइब्रिडा (Hybrida) आहे. गुलाबी, लाल, पांढरा, पिवळा, हिरवा, निळा या रंगाचे व प्रकारचे गुलाब देखील आहेत. आणि जगात गुलाबाच्या 100 पेक्षा जास्त जाती आहेत .
2. Lotas Flower information in marathi ( कमळ फुलाची माहिती )
कमळाचे फुल हे खूप प्राचीन फुल आहे. कमळाला भारतात खूप पवित्र मानतात. कमळ फुल हे लक्ष्मी देवीचे आसन आहे. लक्ष्मी देवी चे आसन असल्या कारणाने हिंदू धर्मात कमळ फुलाला खूप पवित्र मानतात.कमळ फुल हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे. कमळ फुलाला भारतीय संस्कृती मध्ये शुभ आणि पवित्र मानतात.हे एक सुंदर आणि खुबसुरत फुल आहे.
कमळाचे फुल हे चिखलात आणि दलदल युक्त जागेत येते. हे फुल हळू-हळू आणि आणि साचलेल्या पाण्यात जास्त उगते. ज्या मातीत कमी ओक्शिजन असते अश्या ठिकाणी पण उगते.
कमळाचे वैज्ञानिक नाव नेलुम्बो नुसिफेरा (Nelumbo Nucifera) आहे.
कमळाचे प्रकार
कमळाचे चार प्रकार आहेत.- नील कमळ
- ब्रम्ह कमळ
- फेन कमळ
- कस्तूरा कमळ
3. Chameli Flower information in Marathi ( चमेली फुलाची माहिती )
चमेली चे फुल हे खूप सुगंधित असते. चमेली एक फुल नसून चमेली एक वेलं आहे. जी कि आपण आपल्या घरात आणि बागेत लावतो. चमेली के फुल संपूर्ण भारतात मिळतात.
चमेली ची सुगंध मनमोहक आणि मादक असते.
चमेली चे फुल औषधामध्ये पण खूप उपयोगी येते. याची बऱ्याच प्रकारची औषधे बनवली जाते. चमेली चा उपयोग तेल आणि अत्तर बनवण्यासाठी देखील केला जातो
चमेली भारतातील उत्तरप्रदेश च्या गाजीपुर, जौनपुर और फर्रूख़ाबाद भागात विशेष करून आणि जास्त प्रमाणात उगवले जाते.
चमेली फुलाचे वैज्ञानिक नाव जैस्मिनम आहे.
4. Sunflower information in Marathi ( सुर्याफुल माहिती )
सूर्यफुल हे फुल संपूर्ण दिवस सूर्य ज्या दिशेला असतो त्या दिशेला फुलाचे तोंड असते. हे फुल सूर्योदयाच्या वेळेस सुर्यफुल उमलते आणि सूर्यास्ताच्या वेळेस कोमजून जाते.
सुर्यफुल हे सुगंध विरहित असते आणि दिसायला खूप आकर्षक असते. हे फुल अधिक काळ उमललेले राहते.
सूर्यफुलाच्या बिया देखील खाल्या जातात. सूर्यफुलाचे वैज्ञानिक नाव हेलियनथस (Helianthus) आहे.
5. Sadafuli flowers information in Marathi ( सदाफुली फुलाची माहिती )
आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर अंगणात सर्वात जास्त आढळणारे सदाफुली आहे. सदाफुली पांढरी, जांभळी, गुलाबी रंगामध्ये नाजूक आणि मुलायम फुले पाहायला मिळतात.
सदाफुली सौंदर्य बरोबरच औषधी वनस्पती देखील आहे.
मधुमेह, उच्चरक्तदाब, कर्करोग, ओनिमिया, सर्दी अशा आजारावर गुणकारी आहे.
सदाफुलीच्या 5 प्रजाती आहेत.
6. Mogra flower information in Marathi ( मोगरा फुलाची माहिती )
दिसायला सुंदर आणि सुवासिक फुल मुली, महिला आपल्या केसमध्ये मोगऱ्याचा गजरा बनवून लावतात.
मोगरा हा वर्षभर उमलतात. आणि ही एक सदाहरित वनस्पती आहे.
मोगरा हे खूप सुगंधित फुल आहे. मोगऱ्याच्या सुगंधित वासामुळे मन शांत आणि उत्साहित होते.
मोगऱ्याचा वापर हा अत्तरे, साबण, सुगंधित अगरबत्ती, धूप बनवण्यासाठी केला जातो.
तुम्हाला आचर्य वाटेल पण मोगऱ्याचा उपयोग चहा साठी सुद्धा करतात.
मोगऱ्याच्या फुलाचा वापर स्किन टोनर म्हणून देखील करतात.
मोगऱ्याचे प्रकार
मोगरा फुलाचे चार प्रकार आहेत.- मदन मोगरा
- मोतीया मोगरा
- अरबी मोगरा
- वनमल्लिका मोगरा
7. Jaswand Flower information in Marathi ( जास्वंद फुल माहिती )
जास्वंदाचे फुल हे खेडेगावामध्ये देवाची पूजा करण्यासाठी वापरतात. जास्वंदाचे फुल हे लाल, गुलाबी, पांढऱ्या, आणि पिवळ्या रंगामध्ये पाहायला मिळते. फुलांमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त पाकळ्या असतात.
जास्वंदाचे फुल सुगंध विरहित असते. गणपतीची पूजा करण्यासाठी या फुलाचा मोठया प्रमाणात उपयोग केला जातो.
जास्वंदामध्ये काही औषधी गुण देखील आहेत. ज्यावेळेस आपल्या तोंडात पांढरे चट्टे (तोंड येणे) येतात .त्यावेळी जास्वंदाचे कोवळी पाने चाऊन खावीत. त्यामुळे पांढरे चट्टे बरे होतात. आणि वजन कमी करण्यासाठी सुध्दा जास्वंदाचा उपयोग करतात.
आयुर्वेदामध्ये जास्वंदीला औषधी वनस्पतीचा दर्जा दिलेला आहे.
जास्वंदीचं वैज्ञानिक नाव हिबिस्कस सब्दरिफा (Hibiscus Sabdariffa) आहे.
8. Champa Flower information in marathi (चंपा फुलांची माहिती मराठी )
चाफा फुलं दिसायला खूप सुंदर आणि मनमोहक आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणता पांढरा चाफा पाहायला मिळतो.
चाफ्याचा वास हा अत्यंत सुवासिक आणि मनमोहक असतो.
चाफा फुलांमध्ये पण काही प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे पांढरा चाफा, कवठी चाफा, पिवळा चाफा, कनक चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा, नागचाफा व भुईचाफा अशी नावे पडली आहेत. या वनस्पती ला खैरचाफा देखील म्हटले जाते.
भारतात सोन चाफा या प्रकारचा चाफा आढळतो त्याचे शास्त्रीय नाव मायकेलिया चंपका आहे
चाफ्याची फुले ही वसंत ऋतूच्या शेवटी येतात. झाडावर फुले येताना झाडाची जवळपास सर्व पाने गळून गेलेली असतात.
या वनस्पती चे लाकूड हे वजनाने हलके असते. याचा उपयोग दररोजच्या वापरातील पेन्सिल पासून ते जहाज बांधणी पर्यंत होतो. हि आहे चाफा फुलाची माहिती.
9. Jai Flower information in marathi ( जाई फुलांची माहिती मराठी )
जाईचे फुल हे दिसायला पांढरे शुभ्र असते. दिसायला सुद्धा नाजूक असते . जाईच्या फुलांचा वास सांगायचे झाले तर अतिशय सुगंधित असतो.
जाई चे झाड हे वेल वर्गात मोडते. जगभरात जाईच्या जवळपास 200 जाती आढळतात.
जायची फुले ही सायंकाळच्या वेळेस उमलतात.आणि काही वेळात कोमजतात. फुलांचा सुगंध हा रात्रीच्याला जास्त दरवळतो.
जाईच्या फुलापासून तेल सुध्दा काढले जाते.जाईचे तेल थंडावा देणारे असते.
10. Marigold Flower information in marathi ( झेंडूच्या फुलाची माहिती )
झेंडू ची माहिती सांगायचे झाले तर, झेंडूच्या फुलांचा वापर हा मुख्यता हारे बनवण्यासाठी, छोटे पुष्पगुच्छ बनवण्यासाठी केला जातो.तसेच एखाद्या कार्यक्रमात सजवण्यासाठी उपयोग केला जातो.
झेंडू हा थंड हवामाना मध्ये चांगल्या प्रकारे येतो. या वातावरणात झेंडूची वाढ उत्तम प्रकारे होते आणि फुले हि टवटवीत राहतात.
भारतामध्ये झेंडूच्या फुलांचा रंग पिवळा, फिकट पिवळा, नारंगी पाहायला मिळतो. या व्यतिरिक्त झेंडू अनेक रंगामध्ये आढळतो पण इतर देशामध्ये.
आफ्रिकन झेंडू आणि फ्रेंच झेंडू या दोन झेंडूच्या मुख्य जाती आहेत. आणि पुसा नारंगी, पुसा बसंती व एम. डी. यू.१ या तीन संकरीत जाती आहेत.
11. Tulip Flower information in marathi ( ट्यूलिप फुलांची माहिती मराठी )
ट्यूलिप फुल हे जगामधील सर्वात लोकप्रिय फुल मानले जाते. ट्यूलिप ची फुले हि पांढरा, पिवळसर, लाल, तपकिरी, काळा आणि जांभळा या रंगामध्ये पाहायला मिळतात. भारतामध्ये हि फुले फक्त काश्मीर मध्ये मिळतात.
ट्यूलिप फुले हि वसंत ऋतूमध्ये बहरतात म्हणजेच नोहेबर डिसेंबर महिन्यात. थंड वातावरणात या फुलांची वाढ हि उत्तम प्रकारे होते.
12. Nishigandh Flower information in marathi ( निशिगंध फुलाची माहिती )
निशिगंधा चे फुल हे अंत्यंत सुवासिक फुल आहे. निशिगंध फुला ला गुलछबू गुलछडी सुद्धा म्हणतात. निशिगंधाची फुले हि रात्री उमलतात. त्यामुळे या फुलांना निशिगंधा म्हणतात. या फुलांना कृषी क्षेत्रात सुहासिनी या नावाने ओळखतात.
भारतामधील पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मणिपूर, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम या राज्यामध्ये या फुलाची लागवड करून उत्पन्न घेतले जाते.
आणि महाराष्ट्रामधील प्रामुख्याने नाशिक, पुणे, अहमदनगर, ठाणे, सांगली या जिल्ह्यामध्ये निनिगंधा ची लागवड केली जाते.
या फुलातील तेलाचा उपयोग हा अरोमा उपचारासाठी केला जातो.
13. Parijat Flower information in marathi ( पारिजातक फुलाची माहिती )
पारिजातक फुलांचा सुगंध हा खूपच मनमोहक आहे. या झाडाला पारिजात, पारिजातक आणि प्राजक्त या नावांनी ओळखतात.
प्राजक्ता च्या फुलांनाहरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक, अशा अनेक वेगवेगळ्या नावानी ओळखतात.
प्राजक्ताचे झाडे हे जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळतात.
पारिजातकाला आयुर्वेदामध्ये एक ओषधी वनस्पती म्हणून ओळखतात
14. Gokarna information in marathi ( गोकर्णी फुलाची माहिती )
गोकर्णी ची फुले हि गाईच्या कानासारखी असतात. त्यामुळे या फुलांना गोकर्णी किंवा गोकर्ण म्हणतात.भारतामध्ये उगणारी हि एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. हि वनस्पती वेलं वर्गात येते. आणि हि सदाहरित वनस्पती आहे.
गोकर्णी ची फुले हि मान्यत: गडद निळा किंवा पांढरा सफेद या रंगामध्ये असतात. परंतु फिकट निळा, फिकट गुलाबी या रंगामध्ये सुद्धा पाहायला मिळतात.
गोकर्णी ची पाने हि गडद हिरव्या रंगाची असतात. आंनी ती संयुक्त प्रकारची असतात.
या वनस्पतीच्या पानाचा उपयोग औषधामध्ये केला जातो. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी आणि पंचकर्मामध्ये शरीरातील त्रिदोषांना संतुलित करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग करतात.
गोकर्णीच्या प्रत्येक भागाचा उपयोग औषधामध्ये केला जातो. जसे कि फुले, शेंगा, पाने, साल, मुळे इत्यादी.
15. Shevanti Flower information in marathi ( शेवंती फुलाची माहिती )
शेवंती हि वनस्पती आशियायी आणि युरोपी देशातील आहे. या वनस्पतीची फुले हि विविध रंगाची असतात.
वेगवेगळ्या रंगामध्ये शेवंतीची फुले पाहायला मिळतात.
शेवंतीचे झाड हे थंड प्रदेशात पण उगते आणि उष्ण प्रदेशातही चांगल्या प्रकारे उगते.
फुलांची नावे मराठी
मराठी नावे | इंग्रजी नाव |
ताम्हण | Pride of India |
अबोली | crossandra |
कृष्ण कमळ | Passion Flower / Sweet Granadilla |
धोतरा | Datura |
जुई | Common Jasmine |
कण्हेर | Oleander |
कमळ | Lotus |
सूर्यफूल | Sunflower |
गुलाब | Rose |
गणेशवेल | Cypress Vine |
गुलमोहर / शंकासूर | Peacock Flower / Royal Poinciana |
घाणेरी | Lantana Camera |
रातरानी | Night Cestrum |
सोनटक्का | Yellow Ginger |
शेवंती | Chrysanthemums |
Rangoon Creeper | |
झेंडू | Merigold |
कर्दळ | Indian Shot or Canna Indica |
सदाफुली | Periwinkle |
सोनचाफा | Frangiapani or Michelia Champa |
Gokarna | Butterfly Pea |
केवडा | Umbrella Tree or Screw Pine |
तगर | Crepe Jasmine |
चमेली | Spanish Jasmine |
घोळ / घोल | Purslane |
बकुळ | Mimusops Elengi / Bullet Wood |
निशिगंध | Tuberose |
पारिजातक | Coral Jasmine |
मंदार रुई | Aak Flower |
मोगरा | Jasmine Sambac |
चंपा | Magnolia |
जास्वंद | Hibiscus |
कुंदा | jasmine |
निळवेल | Morning Glory |
चाफा | Annona Hexapetala |
रूई | Calotropis Gingantea / Giant Milkweed |
पानसडी | Pansy |