पोपट माहिती मराठी | Parrot information in Marathi
मानवाचा सर्वात जास्त आवडता पक्षी असेल तर तो पोपट असेल. कारण पोपट माणसाच्या हुबेहूब नक्कला करतो, बोलतो. तर पोपट पक्षी माहिती मराठी ( Parrot information in Marathi ) माहिती घेऊया.
पोपट हा पक्षी दिसायला खूप सुंदर आणि देखणा असतो. हा पक्षी जंगली आणि पाळीव या दोन्ही प्रकारामध्ये मोडतो. दिसायला सुंदर असलेला हा पक्षी लोकांच्या खूप पसंतीचा आहे.
भारतामध्ये साधारणतः लहान पोपट आढळतो . त्याचे शास्त्रीय नाव लोरिक्युलस व्हर्नॅलिस आहे. पोपट खूप हुशार आणि बुद्धिमान आहे .पोपट शाकाहारी पक्षी आहे परंतु वेळप्रसंगी किडेही खातो. पोपटाचे आवडीचे खाद्य हे पेरू आणि मिरची आहे.
आपल्याला पोपट माहिती मराठी Parrot information in Marathi पोपट संपूर्ण माहित मिळाली असेल अशी आशा ठेवतो हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना पाठवा.
मानवाचा सर्वात जास्त आवडता पक्षी असेल तर तो पोपट असेल. कारण पोपट माणसाच्या हुबेहूब नक्कला करतो, बोलतो. तर पोपट पक्षी माहिती मराठी ( Parrot information in Marathi ) माहिती घेऊया.
पोपट हा पक्षी दिसायला खूप सुंदर आणि देखणा असतो. हा पक्षी जंगली आणि पाळीव या दोन्ही प्रकारामध्ये मोडतो. दिसायला सुंदर असलेला हा पक्षी लोकांच्या खूप पसंतीचा आहे.
कारण तो सुंदर तर आहेच त्याच बरोबर त्याला बोलायला शिकवले तर तो मानसा प्रमाणे बोलतो. पोपट हा खूप प्रामाणिक पक्षी आहे .
{tocify} $title={Table of Contents}
Parrot information in Marathi
भारतामध्ये पोपट हा हिरव्या रंगामध्ये पाहायला मिळतो. पोपट हा मध्यम आकाराचा पक्षी आहे.जगभरात पांढरा, निळा, हिरवा, रंगबिरंगी, पिवळा, लाल या रंगाचे पोपट पहायला मिळतात. जगामध्ये पोपटाच्या 76 प्रजाती आणि 672 जाती आहेत .लहान पोपटाला "लोरिकीट" म्हणतात तर मोठ्या पोपटाला "पॅराकीट" असे म्हणतात. पोपटाची लांबी 10 ते 12 इंच असते .भारतामध्ये साधारणतः लहान पोपट आढळतो . त्याचे शास्त्रीय नाव लोरिक्युलस व्हर्नॅलिस आहे. पोपट खूप हुशार आणि बुद्धिमान आहे .पोपट शाकाहारी पक्षी आहे परंतु वेळप्रसंगी किडेही खातो. पोपटाचे आवडीचे खाद्य हे पेरू आणि मिरची आहे.
भारतातील पोपटाचे प्रकार - Typs of Parrot information in Marathi
नाव |
शास्त्रीय नाव |
राघू |
सिटॅक्युला
यूपॅट्रिया |
कीर |
सिटॅक्युला
क्रॅमरी |
लालडोकी पोपट |
सिटॅक्युला
सायनोसेफेला |
नीलपंखी पोपट |
सिटॅक्युला
कोलुंबॉयडेस |
भारतात आढळणारा लहान पोपट
(कातरा) |
लोरिक्युलस
व्हर्नॅलिस |
पोपटाची शरीर रचना
गवता सारखा गडद शरीराचा हिरवा रंग .शेपटी थोडीसी पिवळसर आणि थोडी फिकट हिरव्या रंगाची असते. तोच गडद लाल रंगाची आणि थोडी वाकडी असते. डोळ्यांचा रंग पिवळसर पांढरा असतो, डोळ्यांच्या भोवती पिवळ्या रंगाचे कडे असते. नर पोपटाच्या गळ्याभोवती निळ्या रंगाचा पट्टा असतो. मादीच्या गळ्यावर तो नसतो. पाय हे पिवळसर अथवा नारिंगी ते ला रंगाचे असतात.पोपटा मध्ये असलेले गुण
पोपट एकमेव असा पक्षी आहे जो आपल्या पंखांच्या मदतीने अन्नाला पकडू शकतो.पोपटाला बोलण्याचे शिकवले तर तो माणसाप्रमाणे बोलतो .तुम्हाला पोपटाचे बोलण्याचे VIDIO पहायचे असतील तर तुम्ही युट्युब वर ते पाहू शकतात. भरपूर प्रमाणात VIDIO आहेत. पोपट पक्ष्याची स्मरणशक्ती हि इतर पक्ष्यांपेक्षा जास्त चांगली आहे .आपण त्याला सांगितलेली नावे तो सहज लक्ष्यात ठेऊ शकतो .त्याच बरोबर पोपटाला जर गाणे शिकवले तर पोपट ते गाणे गाऊ सुद्धा शकतो.पोपट कोठे राहतो
पोपटाला थंड हवामान जगण्यासाठी अनकुल नाही त्यामुळे पोपट हा जास्त करून उष्ण प्रदेशात राहतो किंवा आढळतो. पोपट झाडाच्या ढोलीत, घरांच्या भिंतीमधील भोकांत अथवा कधीकधी खडकांच्या कपारीत पोपट घरटी करतात. ऑस्ट्रेलियामधील रानटी बजरीगार जातीचे पोपट मात्र ढोलीत थोडेसे गवत घालून घरटे बनवितात. अर्जेंटिनामधील काही जातीचे हिरव्या रंगाचे पोपट प्रजोत्पादनाच्या काळात झाडांवर मोठी सामाईक घरटी बांधतातप्रजनन काळ
पोपटाचा प्रजनन काळ जानेवारी महिन्या पासून ते एप्रिल महिन्या पर्यंत असतो. मादी प्रत्येक वेळी 2 ते 5 अंडी देते पण कधी कधी त्यांची संख्या 8 पर्यंतही असते. अंडी पांढऱ्या रंगाची असतात. तीन आठवड्यानंतर पिल्ले बाहेर येतात. त्यावेळेस ती एका मासाच्या गोळ्यासारखी दिसतात.पोपट काय खातो
पोपटाच्या आवडीचे अन्न पेरू आहे. त्याच बरोबर पोपट दाणे, फळे, बिया, पाने आणि शिजलेला भात आंबा खातो. पोपटाला कठीण कवचाची फळे खायला खूप आवडतात. गावाकडील जुनी माणसे सांगायचे कि पोपटांने खाल्लेली ऊष्टी फळे ही खूप गोड असतात.पोपट पक्षी माहीती व्हिडिओ च्या माध्यामतून
पोपट विषयी रंजक माहिती
- पोपटाला बोलणे, वाचणे, मोजणे शिकवले जाऊ शकते.
- पक नावाच्या एका पोपटाने 1728 शब्द स्मरण केले होते. आणि त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले
- पिग्मी प्रजातीचा पोपट सर्वात लहान व कमी वजनाचे आहेट. त्याचे वजन दहा ग्रॅम असते.
- पोपटाला कधीही चॉकलेट खाऊ घालायला नको. चॉकलेट खाल्ल्याने त्यांचा मृत्यू होऊ शकतो.
- अधिकांश पोपट एका पायावर उभे राहून झोपतात.
- माणसांप्रमाणे पोपट पण लठ्ठपणाचे शिकार होतात.
- पोपटांच्या उडण्याचा वेग 15 ते 25 किलोमीटर प्रति तास असतो.
- काकापो ही एकमात्र पोपटाची प्रजात उडण्यात सक्षम नसते, या मागील कारण त्यांचा लठ्ठपणा आहे.
- उडण्यात सक्षम नसल्याने काकापो ही प्रजात विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
- भारतामध्ये पोपटाला पाळणे बेकायदेशीर आहे.
- पोपटाच्या पंखात अँन्टी बॅक्टेरियल तत्व असतात.
- पोपट एक मात्र असा पक्षी आहे जो आपल्या पंखांच्या मदतीने अन्नाला पकडू शकतो.
पक्षांचे संवर्धन करावे !
पक्षांचे संवर्धन म्हणजे त्यांची संख्या वाढवणे. सध्याला पक्ष्यांची संख्या खुप कमी होत चालेलेली आहे. त्यामुळे त्यांची प्रजाती नस्ट होऊ नये म्हणून आपण योग्य ते उपाय केले पाहिजेत. जसे कि उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज सर्वाना असते .त्याच सोबत प्राण्यांना पक्ष्यांना सुद्धा असते. उन्हाळ्यातील पाण्याच्या कमतरते मुळे अनेक पक्ष्यांचा मृत्य होतो .आपण पक्ष्यांसाठी घराच्या छतावर झाडाच्या फांदीला एखाद्या मडक्यात किवा खोलगट वस्तू मध्ये पाणी थोडेसे धान्य ठेवावे जेणेकरून त्यांच्या जीवाला हानी पोहोचणार नाही.पोपट पक्षी माहिती मराठी | Parrot information in Marathi |
आपल्याला पोपट माहिती मराठी Parrot information in Marathi पोपट संपूर्ण माहित मिळाली असेल अशी आशा ठेवतो हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना पाठवा.
-पोपट माहिती मराठी
Tags:
पक्ष्यांची माहिती